आपल्या विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेटचा अडथळा दूर करताना नैऋत्य रेल्वेने गेल्या वर्षभरात आपल्या विभागात 6 रोड ओव्हर ब्रिज (आरओबी), 77 रोड अंडर ब्रिज (आरयुबी) आणि लिमिटेड हाईट सबवेज (एलएचबी) बनविले आहेत.
गेल्या 29 सप्टेंबर 2020 रोजी निवृत्त रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी लोंढा रेल्वे यार्डची आणि तेथील रेल्वे वाहतुकीची पाहणी केली. त्यावेळी स्थानिक लोकांच्या शिष्टमंडळाने त्यांना विनंती केली की सर्वसामान्यांसाठी ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी लोंढा यार्डातील एलसी गेट नं. 343 च्या ठिकाणी रोड अंडर ब्रीज / लिमिटेड हाइट सबवे निर्माण करण्याची मागणी केली.
कारण लोंढा रेल्वे स्थानकाच्या या गेटमुळे आणि रेल्वे वाहतुकीमुळे सुमारे 250 कुटुंबं जी दुसऱ्या लोंढ्याच्या दुसऱ्या बाजूला राहतात त्यांचा गेल्या 7 दशकांपासून मुख्य लोंढा गावाशी थेट संपर्क होत नव्हता. जेंव्हा स्थानिकांनी ही समस्या महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांच्यासमोर मांडली. तेव्हा त्यांनी त्वरित हुबळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांना ही समस्या युद्धपातळीवर सोडविण्याची सूचना केली त्यानुसार मालखेडे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये संबंधित गेटच्या ठिकाणी लिमिटेड हाईट सब-वे चे बांधकाम हाती घेतले.
या कामाला नोव्हेंबर 2020 मध्ये जिल्हा प्रशासनाची मंजुरी मिळाली. त्यानंतर अवघ्या 50 दिवसाच्या शारीरिक मेहनतीनंतर 6.12 कोटी रुपये खर्चाचा हा सबवे 90 व्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबर 2020 रोजी वाहतुकीसाठी खुला झाला. हा प्रकल्प पूर्ण करण्यास सर्वसामान्यपणे 24 ते 30 महिन्यांचा कालावधी लागला असता. मात्र नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने अवघ्या 90 दिवसात हा प्रकल्प पूर्ण केला. ही कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक नवा विक्रम आहे.
हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ विभागीय अभियंता बी महेंद्र यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ विभागीय अभियंता नीरज बाफना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्वांचे महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग यांनी अभिनंदन केले आहे.