Friday, April 26, 2024

/

अटक करण्यात आलेला शिकारी फरार

 belgaum

बेळगावमधील कित्तूर जवळील कुल्लहळ्ळी जंगल परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून हरणांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली होती.

परंतु अटक करण्यात आलेला शिकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून फरारी झाला आहे. या कारवाईत शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अशोकनगर, बेळगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या मेहमूद अली खान (वय 50) याच्या घरावर अरण्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच धाड टाकली. यादरम्यान शिकारीसाठी वापरण्यात आलेले रायफल, जिवंत काडतुसे, चाकू, सूरी, टॉर्च, वॉकी- टॉकी, दुर्बीण आणि सर्च लाईट यासह अनेक साहित्य संबंधित आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहेत.Hunting

 belgaum

हरणांची शिकार करणाऱ्या चार आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. मेहमूद अली खान याच्यासंबंधित माहिती मिळताच अरण्य अधिकाऱ्यांनी आज त्याच्या निवासस्थानी धाड टाकली.

दरम्यान पोलिसांची कारवाई होत असताना मेहमूद खान याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले आहे. नागरगाळी आणि बेळगाव उपविभागाचे अरण्याधिकारी यांनी ही कारवाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.