युवा समितीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या जननी, आणि सर्वप्रथम मुलींची शाळा स्थापून त्यांना शिक्षित आणि स्वावलंबी बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचले, अशा थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी धनंजय पाटील, तनुजा विनायक कावळे, कोमल हुद्दार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे सरचिटणीस श्रीकांत कदम विनायक कावळे सुरज कुडूचकर, रोहन लंगरकांडे, किरण हुद्दार, अभिजित मजुकर, साईनाथ शिरोडकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
महिला आघाडीतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीचे आचरण
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आचरण महाराष्ट्र एकीकरण महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले.महिला आघाडी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रेणू किल्लेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा आढावा घेतला. सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे आज स्त्रिया एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्या असून स्त्री शिक्षणाचा पाय रोवलेल्या सावित्रीबाईंना त्यांनी आपल्या मनोगताद्वारे अभिवादन केले. सावित्रीबाईंनी दिलेल्या योगदानामुळे आज महिलांचे स्थान उंचावले असून आज सर्वच क्षेत्रामधून महिला अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आघाडीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या आणि स्वावलंबी बनलेल्या महिलाही सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांमुळेच आज याठिकाणी आहेत. त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आपल्याला अभिमान असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रिया कुडची यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती उपस्थित महिलांना देऊन अभिवादन केले. समाजातील अनेक स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी आमरण केलेल्या कार्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मंजू कोळेकर, तेजस्वी मोदगेकर, कीर्ती जाधव, भाग्यश्री जाधव, राजश्री बांबूळकर, दीपा मुतकेकर, श्रद्धा मंडोळकर, माला जाधव, शामिनी पाटील, शिल्पा याकूनी, प्रभा, शकिरा गोकाक, आशा पाटील, शेवंता भोसले, रत्ना, मेघा किल्लेकर, वैशाली आणि महिला आघाडीच्या इतर सदस्या उपस्थित होत्या. मंजुश्री कोलेकर यांनी आभार मानले.
कुद्रेमानीत सावित्री जयंती
कुद्रेमानी येथील ग्रामीणावृद्धी संघाच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित महिलांना या संघाच्या अध्यक्षा प्रा.मधुरा गुरव मोटराचे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवना विषयी आणि स्त्री शिक्षणा विषयी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
सावित्री नमनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.दिपाली कांबळे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले तर शेवंता तलवार यांनी सावित्री प्रतिमेचे पूजन केले.यावेळी लक्ष्मी जांबोटकर,रेणुका गुरव,सिंधू गुरव,वनिता गुरव,लक्ष्मी गुरव आदी उपस्थित होत्या.