मी ओरिजनल जनसंघाचा आहे. गोवा मुक्ती लढ्यामध्ये माझ्या वडिलांनी तीन महिने कारावास भोगला आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव शहरात बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी उपरोक्त माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, मी पूर्वी जनसंघाची दिव्याचे चित्र असलेली करी टोपी आणि हाफ चड्डी घालत होतो.
या संघटनेसाठी माझ्या वडिलांनी तीन महिने कारावास भोगला आहे. कांही वर्षापूर्वी काही अपरिहार्य कारणास्तव मला काँग्रेस पक्षात जावे लागले.
मात्र आमचे जारकीहोळी कुटुंब हे जनसंघ आतूनच आलेले कुटुंब आहे असे सांगून माझे वडील जगन्नाथ जोशी यांचे अनुयायी होते. गोवामुक्ती लढ्यात सक्रिय भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास देखील पत्करला असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.