ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ते बेळगाव ग्रामीण मतदार संघातील 370 हून अधिक जागा भाजपने जिंकल्या असल्याचा दावा जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे हवे असल्यास त्या सर्व 380 सदस्यांना मी एकत्रित बोलावून घेतो, असे खुले आव्हान त्यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले आहे.
बेळगाव येथील शासकीय विश्रामधाम येथे हे आज पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघावर माझे विशेष लक्ष आहे असे सांगून मी या मतदार संघावर कधीच अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले.
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील 380 जागावर भाजप, 280 काँग्रेस आणि आणि बाकीच्या वर इतर निवडून आले आहेत.
बागेवाडी पट्ट्यात संमिश्र जागा निवडून आल्या असून बडाल अंकलगी व अन्य ठिकाणी काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत, असेही जारकीहोळी यांनी नमूद केले.
आगामी दोन दिवसांत भाजप ग्रामीण अध्यक्षांशी चर्चा करून ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सत्कार कार्यक्रम जाहीर करणार असे त्यांनी नमूद केलं.गोकाक धबधबा ग्लास चे पूल युरोप अमेरिकेच्या धर्तीवर विकसित करणार आहे असे त्यांनी नमूद केले