हेस्कॉमतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे पाणी उपसा कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी रविवार दि. 10 आणि सोमवार दि. 11 जानेवारी रोजी शहराला अल्पप्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.
शहरातील ज्या प्रभागांमध्ये 4 तास पाणीपुरवठा होतो, तेथे देखील सदर दोन दिवस अल्पप्रमाणात पाणीपुरवठा होईल. हेस्कॉमकडून दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे शहराला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.
तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन शहर पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.