विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य प्रकाश राठोड यांच्यावर सभागृहात अश्लिल चित्रफित पाहिल्याचा गंभीर आरोप झाला असून या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तथापि राठोडी यांनी हा आरोप फेटाळून लावत “मी अश्लील कांहीही पहात नव्हतो”, असे स्पष्टीकरण दिले आहे.
विधान परिषदेतील सभागृहांमध्ये शुक्रवारी प्रश्नोत्तर चर्चेवेळी एमएलसी प्रकाश राठोड मोबाईलमध्ये ते बघत असताना त्यामध्ये अश्लील चित्रफित असल्याचे दृश्य एका वाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. दरम्यान राठोड यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना आरोप फेटाळून लावले आहेत. आपण अश्लील चित्रफीत पाहिलेली नाही. आपल्या मोबाईलमध्ये तशा चित्रफिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या सुरू असताना प्रकाश राठोड यांनी मोबाईलमधील गॅलरी उघडल्यानंतर ते स्क्रोल करत असताना त्यामध्ये काही चित्रफिती अश्लील दिसून आल्याचे वृत्त आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसारित केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप नेत्यांनी राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान याविषयी प्रतिक्रिया देताना प्रकाश राठोड यांनी आपण सभागृहात मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहिलेली नाही. सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेत आपलाही प्रश्न होता. तो मांडण्यासाठी आपण फाईल शोधत होतो.
मोबाईलमधील स्टोरेज फुल्ल झाल्यामुळे ते डाऊनलोड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आपण त्यातील डेटा डिलीट करत होतो. आपल्याला अनेक जणांकडून व्हिडिओ -फोटो येतात, पण ते सर्वच आपण डाउनलोड करत नाही. आपली नाहक बदनामी करू नये अशी विनंतीही एमएलसी प्रकाश राठोड यांनी केली आहे.