Friday, April 19, 2024

/

जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील विवाहितेची आत्महत्या

 belgaum

सासरच्या जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रेणुका शिवानंद वड्डर (वय ३२, रा. रामतीर्थनगर) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यावर माळमारुती पोलीस स्थानकावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळे रेणुकाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी रेणुकाची वडिलांनी फिर्याद दिली असून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

 belgaum

तसेच तिला माहेरून सतत पैसे आणायला लावत असत. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.