महानगरपालिकेसमोर भगवा फडकविण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार यांच्या बेळगाव प्रवेशावर पोलीस खात्याने बंदी घातली आहे. या आशयाचे परिपत्रक वरिष्ठ जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
बेळगाव महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा हटविण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि तमाम मराठी भाषिकांनी केली आहे. परंतु हा ध्वज अद्याप हटविण्यात न आल्याने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार तात्काळ स्थगित करण्यात आला आहे. परंतु कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार हे शिनोळी फाटा येथे आंदोलन करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेसमोर आज भगवा ध्वज फडकाविणारच असा निर्धार शिवसैनिकांनी केला असून सीमाभागात प्रवेश घेणाऱ्या विजय देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने प्रवेश बंदी केली आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांकडून प्रक्षोभक भाषण केली जाण्याची शक्यता असून बेळगावमधील वातावरण बिघडू शकेल, आणि कोणताही अनुचित प्रकार घडू शकेल, यामुळे खबरदारी म्हणून या नेत्यांना बेळगाव प्रवेश बंदी करण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कर्नाटक पोलीस कायदा कलम ३५ अन्वये हा आदेश जारी करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिनोळीतला संघर्ष-भगव्या ध्वजासह सीमा भागात घुसणाऱ्या शिवसैनिकाना कर्नाटक पोलिसांनी असे अडवले तो व्हीडिओ पहा बेळगाव Live वर
https://www.facebook.com/375504746140458/posts/1309105696113687/