बेळगाव तालुक्या तील कडोली येथील कन्नड हायस्कुलचे एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले असून तातडीने आज शाळेला एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
. नुकतेच शिक्षण खात्याने दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या.
दरम्यान सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीचे अहवाल आता येत असून या अहवालात कडोली येथील कन्नड हायस्कुलचे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले आहे.
तातडीने शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच खबरदारीचा एक दिवसाची सुट्टीही जाहीर केली.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्याजागी दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.