Tuesday, January 14, 2025

/

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

 belgaum

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवार दि. 16 आणि रविवार दि. 17 जानेवारी 2021 रोजीच्या नवी दिल्लीपासून बेळगावसह संपूर्ण कर्नाटक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार रविवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 10:15 आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता गृहमंत्र्यांचे बेळगाव हेलिपॅडवर आगमन होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 16 जानेवारी रोजी रेसिडेंस 6 ए, किशन मेमन मार्ग, नवी दिल्ली येथून रस्तेमार्गे सकाळी 8:35 वाजता विमानतळाकडे प्रस्थान विमानाने सकाळी 9 वाजता निघून सकाळी 11:30 वाजता एचएएल एअरपोर्ट बेंगलोर येथे आगमन तेथून 11:40 वाजता हेलिकॉप्टरने निघून शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती हेलिपॅडवर आगमन.

भद्रावतीहून 12:40 वाजता निघून भद्रावती जलद कृती दल केंद्राच्या ठिकाणी आगमन. भद्रावती येथे दुपारी 1 ते 3:40 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग. त्यानंतर पुन्हा एचएएल एअरपोर्ट बेंगलोरकडे रवाना तेथून सायंकाळी 5 वाजता विधानसौध बेगलोर येथे आगमन. विधानसौध बेंगलोर येथे सायंकाळी 5:10 ते 8:30 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमात सहभाग. तेथून रस्ते मार्गे मुक्कामासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री 8:45 वाजता हॉटेल विंडसर मेनोर, बेंगलोर येथे पोहोचतील.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 9 वाजता हॉटेलमधून निघून रस्ते मार्गे सकाळी 9:30 वाजता एचएएल एअरपोर्ट बेंगलोर येथे जातील, तिथून 09:35 वाजता निघून 10:15 वाजता बेळगावच्या हेलिकॉप्टरवर त्यांचे आगमन होईल. तेथून 10:25 वाजता ते बागलकोटकडे प्रस्थान करतील. बागलकोट येथे 10:55 वाजता पोहोचल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तेथील निराणी ग्रुपच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 12:25 वाजता बागलकोट येथून निघून दुपारी 1 वाजता त्यांचे पुन्हा बेळगाव हेलिपॅडवर आगमन होणार आहे.

तेथून बेळगाव सर्किट हाऊस येथे जाऊन ते दुपारी 01:15 ते 03:15 वाजेपर्यंत विश्रांती घेतील. विश्रांतीदुपारी 3 वाजता सर्किट हाऊस येथून निघून 03:30 वाजता जेएनएमसी बेळगाव येथे पोचतील. जेएनएमसी येथे दुपारी 03:30 ते 4 वाजेपर्यंत ते काहेर हायटेक ॲडव्हान्स सिम्युलेशन ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. तेथून 4 वाजता निघून रस्तेमार्गे ते जेएनएमसी मैदानावरील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.

जेएनएमसी मैदानावरील कार्यक्रमात 04:10 ते 05:30 वाजेपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सहभाग असेल. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शहा सायंकाळी 05:40 वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. याठिकाणी ते त 06:05 मिनिटापर्यंत थांबणार असून तेथून 06:15 वाजता हॉटेल संकम येथे पोहोचतील.

हॉटेल संकम येथे सायंकाळी 06:15 ते 07:15 वाजेपर्यंत चालणाऱ्या बैठकीस ते उपस्थित राहतील. हॉटेल संकम येथून 07:15 वाजता रस्तेमार्गे निघून बेळगाव विमानतळावर 07:20 वाजता पोहोचतील. बेळगाव विमानतळावरून 07:25 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीच्या दिशेने रवाना होती. नवी दिल्ली विमानतळावर त्यांचे रात्री 09:55 वाजता आगमन होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.