कासरगोड कस्टम अधिकाऱ्यांनी मिळालेल्या खात्रीलायक माहिती वरून सापळा रचून कार गाडीतून तस्करी करण्यात येत असलेले सुमारे 4 किलो ग्रॅम सोने जप्त केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी बेळगावच्या दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे.
तुषार (वय 27) आणि ज्योतीराम (वय 23, दोघे रा. शहापूर, बेळगाव) अशी अटक करण्यात आरोपींची नांवे आहेत. मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून कासरगोड कस्टम अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पल्लीकेरी टोलनाका येथे सापळा रचला.
त्यानंतर कन्नूर येथून मंगळूरकडे जाणारी एक कार गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत लपून तस्करी करण्यात येत असलेले 4 किलो ग्रॅम वजनाचे बेकायदेशीर सोने आढळून आले. याप्रकरणी कार गाडीतील तुषार व ज्योतीराम या दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे.
कस्टमचे सहाय्यक आयुक्त ई. व्ही. विकास आणि कन्नूर कासरगोड कस्टम आयुक्त पी. पी. राजीव यांच्या मार्गदर्शनाखाली के. चंद्रशेखर, के. आनंद कोरागोड्ड व एम. विश्वनाथ यांनी ही कारवाई केली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कासरगोड कस्टम अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे तस्करी करण्यात येत असलेले 6.2 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले होते.