Tuesday, January 28, 2025

/

डियरहूड फाउंडेशनचा “फूड कार्ड” व्हिडिओ झाला व्हायरल!

 belgaum

डियरहूड फौंडेशन या नफा न घेता कार्य करणाऱ्या संघटनेने आपल्या “फूड कार्ड” संदर्भात शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.

डियरहूड फौंडेशनच्या फूट कार्डची अभिनव संकल्पना बेळगावात सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावरील भिकाऱ्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांना पैसे अर्थात भीक दिली जाते. मात्र बऱ्याचदा त्यांना दिलेला पैसा व्यसनांमध्ये किंवा अन्य गैरकृत्यात उडविला जातो. परिणामी या व्यसनाधीनतेतून समाजाला उपद्रवाला सामोरे जावे लागते. तेंव्हा भिकारी अथवा गरीब गरजूंना पैसे देण्याऐवजी थेट पोटभर अन्न उपलब्ध करून देणे हा या फूट कार्ड संकल्पनेचा मूळ उद्देश आहे.

एका फूड कार्डची केवळ किंमत 10 रुपये असून या कार्डचा वापर फक्त अन्नासाठी केला जाऊ शकतो. फाउंडेशनशी संलग्न कॅन्टीन आणि रेस्टॉरंटमध्येच या फूड कार्डच्या मोबदल्यात अन्न उपलब्ध होणार आहे. यामुळे भुकेल्या गरिबाला आपण पोटाला खाऊ घालत असल्याचे समाधान भीक देणाऱ्याला मिळणार आहे. या फूड कार्डमुळे नागरिकांनी भीके दाखल दिलेले पैसे गैरमार्गाला न लागता अन्नासाठी सत्कारणी लागणार आहेत.

 belgaum

डियरहूड फाउंडेशन या नफा न घेता कार्य करणाऱ्या संघटनेची कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत गेल्या 2020 आली अधिकृत नोंदणी झालेली आहे. या फाऊंडेशनचे फूड कार्ड https://dearhood.org/ या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध असणार आहेत. शहरातील ऑटोनगर, रामतीर्थनगर, वंटमुरी, महांतेशनगर, श्रीनगर, उज्वलनगर, केएलईनजीक नेहरूनगर, बॉक्साइट रोड आदी ठिकाणी फाउंडेशनची संलग्न कॅन्टीन व रेस्टॉरंट असून अन्य भागातही आपली फूड कार्डची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डियरहूड फाउंडेशन प्रयत्नशील आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.