हुबळी -लोकमान्य टिळक टर्मिनल -हुबळी या 07317 /07318 क्रमांकांच्या फेस्टिव्हल एक्सप्रेस स्पेशल रेल्वेच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात येत असून तो आता मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी) ऐवजी दादर असणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
फेस्टिवल एक्सप्रेसचा हुबळी ते दादर असा टर्मिनल बदल दि. 31 जानेवारी 2021 पासून तर दादर ते हुबळी हा टर्मिनल बदल 1 फेब्रुवारी 2021 पासून लागू होईल. हुबळी -दादर फेस्टिव्हल एक्सप्रेस रेल्वे (क्र. 07317) दुपारी 03:30 वाजता हुबळी येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 7 वाजता दादरला पोहोचेल.
बेळगाव रेल्वे स्थानक येथे या रेल्वेचे सायंकाळी 6:10 वाजता आगमन आणि 6:15 वाजता प्रस्थान होईल. त्याप्रमाणे दादर -हुबळी फेस्टिव्हल एक्सप्रेस स्पेशल रेल्वे (क्र. 07318) दादरहून रात्री 08:25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 11:35 वाजता हुबळीला पोहोचेल. बेळगाव येथे या रेल्वेचे सकाळी 08:15 वाजता आगमन आणि 08:20 वाजता प्रस्थान होईल.