बेळगाव शहरातील भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी झफरखान मोहम्मद अलीखान सरवर याने मूडबिद्री (मंगळूर) येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या कर्नाटक राज्य कनिष्ठ ॲथलेटिक चॅम्पियनशिप -2021 मधील तिहेरी उडी (ट्रिपल जंप) आणि लांब उडी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्यामुळे त्याची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.
न्यू गांधीनगर बेळगाव येथील रहिवासी असणारा झफरखान मोहम्मद अलीखान सरवर या भरतेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मूडबिद्री (मंगळूर) येथे अल्वाईस एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित 36 व्या कर्नाटक राज्य कनिष्ठ चॅम्पियनशिप -2021 मधील तिहेरी उडी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले आहे.
त्याचप्रमाणे त्याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक हस्तगत केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे झफरखान यांची आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गुवाहाटी (आसाम) येथे येत्या 6 ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये राष्ट्रीय ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
या पद्धतीने जिल्हा आणि राज्य पातळीवर चमक दाखविणाऱ्या झफरखान याला प्रशिक्षक प्रदीप जुवेकर व शिरीष सांबरेकर यांचे मार्गदर्शन तर वडील मोहम्मद अलीखान सरवर यांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल झफरखान यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.