Sunday, November 17, 2024

/

ग्रेट इंडियन गोल्डन कॉड्रीलॅट्रल धावणाऱ्या “या” धावपटूचे उस्फुर्त स्वागत

 belgaum

देशभरात माणुसकी, ऐक्य, शांती, समानता आणि सशक्त जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या चार प्रमुख मेट्रो शहरांना जोडणारा 6000 कि. मी. अंतराचा ग्रेट इंडियन गोल्डन कॉड्रीलॅट्रल रोड धावून पूर्ण करण्याचा “रन ऑफ होप” हा उपक्रम हाती घेतलेल्या अजमेर (राजस्थान) येथील सुफिया या महिला मॅरेथॉन धावपटूचे आज सकाळी बेळगावात उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

बेळगाव शहरांमध्ये बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, ॲपटेक अकॅडमी आणि सरस्वती इन्फोटेकतर्फे मुंबई येथून आगमन झालेल्या मॅरेथॉनपटू सुफिया आणि तिचे पती विकास यांचे पुष्पहार पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विनोद बामणे आणि ॲड. कमलकिशोर जोशी यांची सुप्रियाला तिच्या उपक्रमासाठी शुभेच्छा देणारी भाषणे झाली. यावेळी यशपाल पुरोहीत, अमेय याळगी, सूर्यकांत हिंडलगेकर, करुणा वाघेला, श्रेया वाघेला, भक्ती हिंडलगेकर, मधुरा मिसाळे, सृष्टी होनग्गी, खुशी घोतीवरेकर, अविनाश कोरीशेट्टी, सक्षम जाधव, देवेन बामणे, प्राची शिंदे, दयानंद नेतलकर, अतुल याळगी, राजन वाघेला, श्रीमती कोरीशेट्टी, श्रीमती घोतीवरेकर, रवींद्र जाधव, अक्षय सूर्यवंशी, चौकसिंह पुरोहित आदी उपस्थित होते. आपल्या स्वागताबद्दल सुफिया आणि तिथे पती विकास यांनी आनंद व्यक्त करून धन्यवाद दिले.

अजमेर येथील सुफिया ही 35 वर्षीय धावपटू गेल्या 10 वर्षापासून विमान उड्डाण एव्हिएशन क्षेत्रात काम करते. यापूर्वी 2019 मध्ये तिने काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर धावून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे 2018 मध्ये देशातील गोल्डन ट्रँगल रोड धावून पूर्ण करणारी ती पहिली महिला धावपटू ठरली आहे. देशातील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकता या प्रमुख मेट्रो शहरांना जोडणारा 6000 कि. मी. अंतराचा ग्रेट इंडियन गोल्डन कॉड्रीलॅट्रल रोड धावून पूर्ण करण्याचा “रन ऑफ होप” या आपल्या धावण्याच्या उपक्रमाला सुफिया हिने गेल्या 16 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया गेट पासून प्रारंभ केला आहे. त्यानंतर तिने मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथे गेल्या 14 जानेवारी 2021 रोजी सकाळी पोहोचून उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.

आपल्या उपक्रमा दरम्यान दररोज 50 कि. मी. अंतर धावणाऱ्या सुफियाने आज सकाळी बेळगावातून प्रस्थान केले, त्यावेळी बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटुनी कांही अंतर स्केटिंग करून सुप्रियाला तिच्या उपक्रमात साथ दिली. जयपूर, अजमेर, उदयपूर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई, विशाखापटनम, भुवनेश्वर, कोलकाता, वाराणसी, कानपूर आणि आग्रामार्गे नवी दिल्ली येथे सुफिया आपल्या उपक्रमाची सांगता करणार आहे. सदर 6 हजार किलोमीटर धावण्याचा उपक्रम 135 दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी त्यापेक्षाही कमी दिवसात सदर अंतर धावून पूर्ण करण्याचा निश्चय सुफियाने बोलून दाखविला आहे. “रन ऑफ होप” हा उपक्रम यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्यास सुफियाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून नोंद घेतली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.