सोमवारी (दि. २५) गोवावेस खानापूर रोड ट्रेंड्स शो रूम जवळ दरम्यान साईप्रसाद लाड या युवकाची पैशाने भरलेली बॅग हरवली होती. पेट्रोल पॅम्पवर कामाला असणाऱ्या हा युवक बँकमध्ये पैसे भरण्यासाठी जात असताना अचानक हि बॅग हरवली. दरम्यान आपली बॅग पडली हे त्या युवकाच्या लक्षात आले नाही.
परंतु एका तरुणाच्या हजारजबाबीपणामुळे ती बॅग संबंधित युवकाला परत मिळाली आहे. विनायक कल्लाप्पा सोमनाचे यांच्यामुळे जवळपास २५ हजारहून अधिक रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असणारी हि बॅग सोमनाचे यांच्या प्रामाणिकपणामुळे साईप्रसाद लाड यांना परत मिळाली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘बेळगाव लाईव्ह’वर प्रकाशित करण्यात आले होते.
सोमवारी साईप्रसाद लाड हा युवक बँकमध्ये पैसे भरण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याच्याजवळील बॅग हि रस्त्यावर पडली. याचठिकाणी उपलब्ध असलेल्या विनायक कल्लाप्पा सोमनाचे यांनी हा प्रकार पहिला. त्यांनी ताबडतोब पाठीमागून हाक मारण्यास सुरुवात केली.
परंतु साईप्रसाद लाड यांची दुचाकी वेगात असल्यामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही. हि बॅग उघडून पहिली असता त्यामध्ये २५ हजारहून अधिक रोख रक्कम आणि इतर महत्वाची कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले. सोमनाचे यांनी ताबडतोब पोलीस स्थानक गाठले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संबंधित तरुणापर्यंत पोहोचण्यासाठी सोमनाचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केला.
हनुमान नगर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठीही प्रयत्न करण्यात आला. परंतु यासाठी बुडाची परवानगी घेणे आवश्यक होते. हि इतकी लांबलचक प्रक्रिया करणे अवघड वाटल्यामुळे पोलीस स्थानकात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आणि थेट ‘बेळगाव लाईव्ह’ शी संपर्क साधत हि बातमी सर्वांपर्यंत पोहोचविली. ‘बेळगाव लाईव्ह’ वर हे वृत्त प्रसारित होताच संबंधित युवकाने हि बॅग आपली असल्याचे सांगितले. शहानिशा करून हि बॅग साईप्रसाद लाड या युवकाला विनायक सोमनाचे यांनी परत केली.
पोलीस आणि सोमनाचे यांचे इतर सहकारी सोमशेखर चचडी, सिद्धू मुदिगौडर, विक्रांत सोमनाचे, बापू भडांगे आणि निखिल सांबरेकर यांच्या उपस्थितीत साईप्रसाद लाड यांना हि बॅग परत करण्यात आली असून विनायक सोमनाचे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे तसेच बेळगाव लाईव्हचे कौतुक करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1311948029162787/
https://www.facebook.com/375504746140458/posts/1312593255764931/