कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील चंदगड तालुक्यात असलेल्या किटवाड धरणात बेळगावचा युवक बुडाला आहे रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सदर मृत युवकाचे नांव अभिषेक अप्पाजी सज्जन (वय २४ रा. माळमारुती, बेळगाव) असे आहे. तलावाच्या पाण्याची खोली अधिक असल्याने मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले नाही. सायंकाळ झाल्यामुळे बचावकार्य थांबविण्यात आले असून, सकाळी पुहा शोध मोहीम सुरु केली जाणार आहे. सायंकाळी नागणवाडी येथील इसमाला पाण्यातील मृतदेह काढण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. परंतु अद्याप मृतदेहाचा शोध लागला नाही. आणि अद्याप या घटनेची नोंदही पोलिसात झाली नाही.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बेळगावसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. सदर मृत युवक कुटुंबियांसमवेत पर्यटनासाठी गेला होता. कालकुंद्रीकडे असलेल्या लघु पाटबंधारे तलावाच्या पाण्यात उतरण्याचा मोह अभिषेकला झाला. तलावात सुमारे ५० फूट आत गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पोहताही न आल्याने अभिषेक पाण्यात बुडाला. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले होते.
बेळगाव आणि चंदगड तालुक्याच्या सीमेवर जवळपास शहरापासून २० कि मी अंतरावर हि घटना घडली आहे. घटनास्थळी चंदगड पोलीस दाखल झाले असून मृतदेहाची शोधाशोध सुरु झाली आहे. अभिषेक बुडाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी हंबरडा फोडला होता या प्रकरणी चंदगड पोलिसात फिर्याद नोंद करण्यात आली आहे. सध्या कोरोन काळात शाळा सुट्टी असल्याने किटवाड किंवा दांडेली सारख्या पर्यटन स्थळी सहली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु तरुणांच्या अतिउत्साहीपणामुळे हे पर्यटन जीवावर बेतण्याचे प्रमाण बांधले आहे. अभिषेकच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.