महाराष्ट्रातील सोलापूर, कर्नाटकातील बंगळूर आणि हुबळी येथील चोरी केलेल्या वाहनांची घटप्रभा आणि राजापूर हद्दीत विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या चोरांना अटक केली आहे.
वासुदेव सहदेव नाईक (वय ३४) रा. खणदाळ, ता. रायबाग, महांतेश यल्लाप्पा करगन्ने (वय २४) रा. खानट्टी, ता. मुडलगी, विवेकानंद चौडय्या तळवार (वय २०) रा. राजापूर, ता. मुडलगी अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हा सीईएन (डिसीबी) पोलीस स्थानकाचे पोलीस इन्स्पेक्टर विरेश दोडमनी, जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण निंबरगी आणि जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर विरेश दोडमनी यांच्या सहकाऱ्यांनी हि कारवाई केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुड्स ट्रक, महिंद्रा बोलेरो पिकअप, महिंद्रा बोलेरो जीप, महिंद्रा स्कॉर्पियो चार अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत असून पुढील तपास करण्यात येत आहे. हे प्रकरण घटप्रभा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आले आहे.
या कारवाईत जिल्हा सीईएन (डिसीबी) पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी, एएसआय अशोक भजंत्री, एएसआय जी. सी. हेगडे, एएसआय के. आर. इमामनवर आणि बी. एस. चिन्नीकुप्पी, वाय. व्ही. सप्तसागर, एल. एन. कुंभारे, एस. आर. माळगी, एस. सी. अंबरशेट्टी, ती. एच. केळगेरी, एम. बी. कांबळे, एन. एल. गुड्डेन्नवर, व्ही. आय. नाईक, एस. ए. बेवनूर, जी. एस. लमाणी, ओ. नागराज, डी. के. देयन्नवर, सविता पाटील, सुनील कांबळे यांनी सहभाग घेतला.