“सुदृढ भारत – सशक्त भारत” यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बेळगांवचा शुभम शके हा सायकलपटू उद्या रविवार दि. 6 डिसेंबर 2020 पासून बेळगांव ते बेंगलोर आणि धर्मावरम ते अनंतपूर असा सुमारे 800 कि. मी. अंतराचा सायकलिंग उपक्रम राबविणार आहे.
शुभम नारायण शके हा 17 वर्षीय सायकलपटू बेळगाव भरतेश पॉलीटेक्निक कॉलेज कुडचीचा विद्यार्थी आहे. फिट इंडिया -स्ट्राँग इंडिया अर्थात सुदृढ भारत – सशक्त भारतासंदर्भातील त्याच्या बेळगांव ते बेंगलोर आणि धर्मावरम ते अनंतपूर असा सुमारे 800 कि. मी. अंतराच्या सायकलिंग उपक्रमाला रविवार 6 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता शहरातील श्री बसवेश्वर सर्कल येथून प्रारंभ होणार आहे.
सायकलिंग करत शुभम शके बेंगलोर येथे 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पोहोचणार असून त्यानंतर 8 डिसेंबरपासून तो बेंगलोर शहरांमध्ये आठवडाभर जनजागृती मोहीम राबविणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी तो धर्मावरमला प्रयाण करेल आणि तेथून 20 डिसेंबरला अनंतपूरला रवाना होईल.
समाजातील प्रत्येकाने आरोग्यपूर्ण आणि सुदृढ राहावे यासाठी शुभम नारायण शेके याने ही मोहीम हाती घेतली आहे. शुभमच्या या मोहिमेला इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड बेळगांव, विनूग्राम सायकलिंग क्लब बेळगांव, श्रीनगरी कॉलनी ग्रुप बेळगांव, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव (परिवार), भरतेश पॉलीटेक्निक कॉलेज बेळगांव, रवी धोत्रे, सतीश पाटील, प्रदीप तेलसंग आणि संतोष श्रीनगरी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.