आयटीबीपी (इंडो तिबेट बॉर्डर पोलीस) च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला भरधाव ट्रकने धडक दिल्याने पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टीजवळील राम ढाब्याजवळ झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले.
शुक्रवारी रात्री हा अपघात घडला असून या घटनेसंदर्भात काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
या अपघातात राजेश गुप्ता (वय २८), सकना रोहित (वय २९), गोपाळ सुमन (वय २८), दाबी दिनेश (वय ५३), राशीपाल सिंग (वय ५०), ई. शिवकुमार (वय ४३) हे जण जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर ट्रकचालक फरारी झाला आहे. या अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळळूर, उपनिरीक्षक आर. टी. लक्कनगौडर आदी अधिकारी करीत आहेत.