ग्राम पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे बेळगाव तालुक्यात एकूण 55 ग्राम पंचायतीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. बेळगाव तालुक्यातील देसुर ग्राम पंचायतीत नको त्या घटना समोर येत आहेत.
मतदानाच्या एक दिवस अगोदर मत पत्रिका फुटलेली होती त्याची चौकशी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी चालवलेली असतानाच आणखी एक घटना देसुर मध्ये घडली आहे.
मंगळवारी मतदाना रोजी पोलिंग बूथ वर निवडणुकी साठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे रिव्हॉल्व्हर सापडली आहे. मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्याकडे लोडेड पिस्तुल सापाडली असून या घटनेचा तपास पोलिसांनी चालवलेला आहे.
कर्मचाऱ्या कडे बंदूक असल्याची माहिती मिळताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना याची माहिती दिली यावर पोलीस अधिक तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भरलेली पिस्तुल मतदान केंद्रातून बाहेर काढा अश्या सूचना तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ठोस पणे बजावण्याची गरज असताना मतपत्रिका लिक करणे किंवा मतदान केंद्रात शस्त्रे बाळगणे असे बेजबाबदार कृत्ये करत आहेत अश्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वाढू लागली आहे.