Friday, December 20, 2024

/

बेळगावसाठी दिलासा …ती ब्रिटिश रिटर्न महिला निगेटिव्ह

 belgaum

बेळगावात लंडन हुन आयसोलेशन मध्ये असलेल्या ब्रिटिश महिलेचा घशाच्या द्रवाची तपासणीचा अहवाल मिळाला असून तो अहवाल निगेटीव्ह आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इंग्लड हुन परतलेल्या महिलेचा नमुना निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून हजारो रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत कोरोनाचा नवीन विषाणू ब्रिटन मध्ये आढळला आहे परिणामी खबरदारी म्हणून भारत सरकारने इंग्लंडहून भारतात येणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून आलेल्या एका महिलेला बेळगावमध्ये आयसोलेट करण्यात आले होते.

लंडनहून बेळगांवमध्ये आलेल्या एका महिलेच्या घशातील स्त्रावाचे (स्वॅब) नमुने घेऊन तिला बेळगांवात आयसोलेट करण्यात आले होते इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना सदर महिला बेळगांवात आली आहे. बेळगाव विमानतळावर तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने आरोग्य खात्याने तिच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या 14 डिसेंबर रोजी ही 35 वर्षीय महिला लंडनहून बेंगलोरला आली होती. त्यानंतर ती जमखंडीला जाण्यासाठी बेळगांवात आली होती. याबाबत बेळगांव आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता तिचे असे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल मंगळवारी रात्री उपलब्ध झाला.

सध्या संबंधित महिला घरातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आपल्या पतीसमवेत सदर महिला बेळगावात आली असून त्यांची मुले इंग्लंडमध्ये आहेत.

दरम्यान, लंडनहून नवी दिल्ली येथे आलेल्या 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या अर्ध्याहून अधिक युरोप खंड कोरोनाच्या नव्या विषाणूच्या विळख्यात सापडला आहे. तेंव्हा आपण देखील तैवान आणि व्हिएतनाम प्रमाणे अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.