Sunday, November 17, 2024

/

पोलीस बंदोबस्तात मनपासमोर अनधिकृतरित्या फडकला लाल-पिवळा

 belgaum

एप्रिल महिन्यात होणाऱ्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटना सक्रिय झाल्या असून सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी महानगरपालिकेसमोर पोलीस बंदोबस्त असूनही कन्नड संघटनांनी अनधिकृतरित्या लाल-पिवळा ध्व्ज फडकाविला आहे. या घटनेनंतर बेळगावमधील राजकारण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती, राष्ट्रीय पक्ष आणि कन्नड संघटना आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी आतापासून सर्व संघटना बळावल्या असून आज महानगरपालिकेसमोर झालेला प्रकार बेळगावमधील राजकारण वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

सोमवारी दुपारी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेट समोर सिमेंट काँक्रेट घालून हा ध्वज फडकवला आहे.
महानगरपालिकेसमोर असलेल्या फलकासमोर काँक्रीटीकरण करून त्यावर ध्वज फडकविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या दरम्यान पोलीस देखील उपस्थित होते. परंतु हा सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी सुरुवातीला कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. हा ध्वज फडकविण्यात आल्यानंतर राष्ट्रगीत गायनही कन्नड संघटनांनी केले असून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सूट दिली असल्याचे निदर्शनास आले आहे.Red yellow flag ccb

या ध्वजावरून आगामी महानगरपालिका निवडणुकीत राजकारण पेटणार असून यामागे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांविरोधात कटकारस्थान रचण्यात येत असल्याचा वास येत आहे. 2009 साली महानगरपालिका इमारतीच्या स्थलांतराचे निमित्त सांगून महापालिकेवर असणारा भगवा ध्वज हटविण्यात आला होता.

तत्कालीन भाजप सरकारने रिसालदार गल्ली येथील महानगरपालिकेच्या इमारतीवरील भगवा ध्वज हटविला होता. त्यानंतरच्या कालावधीत महानगरपालिकेच्या नव्या इमारतीवर भगवा ध्वज फडकविण्यात आला नव्हता. परंतु यानंतर पोलीस बंदोबस्त असूनही आज सकाळी मनपा इमारतीसमोर लाल-पिवळा फडकविण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.