परिवहन आंदोलनातील एकाचा हृदयविकाराने मृत्यू-विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप दरम्यान एका बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
बंगळूर येथील आंदोलनाला बेळगाव परिवहन विभागाने पाठिंबा दर्शविण्यासाठी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. दरम्यान बेळगाव येथे शनिवारीही हा संप तसाच सुरु ठेवण्यात आला. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणीच एका बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
वडगाव येथील दत्ता मंडोळकर (वय ५८) असे मृत चालकाचे नाव आहे. सदर व्यक्ती परिवहन विभाग घटक – २ येथे कर्यरत होती.
शनिवारी परिवहन कर्मचाऱ्यांनी चप्पल डोक्यावर घेऊन शुक्रवारचे आंदोलन सुरूच ठेवले. हे आंदोलन सुरु असताना सादर व्यक्तीच्या छातीत दुखायला सुरु झाल्याने हि व्यक्ती घरी परतली होती. घरी परतल्यानंतर रात्री उशिरा या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.