Friday, January 31, 2025

/

निवडणुकीचा निर्णय नसल्यामुळे कॅन्टोन्मेंट सदस्यांमध्ये संभ्रम

 belgaum

देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांलापैकी चार बोर्डांची पंचवार्षिक निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र संरक्षण मंत्रालयाने संबंधीत कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाठवले आहे. मात्र बेळगांवसह 58 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीचा निर्णय झाला असला तरी बेळगांव कँटोन्मेंट बोर्डकडून अद्याप कोणतीच हालचाल नसल्याने लोकनियुक्त सदस्य संभ्रमात पडले आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांचा वाढीव कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. संरक्षण मंत्रालयाने बदामीबाग, जम्मू व रामग्रह या तीन कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कार्यकाल 12 फेब्रुवारी आणि मेरठ कॅन्टोन्मेंट बोर्डचा कालावधी 12 जानेवारीला पूर्ण होणार असल्याचे म्हंटले आहे.

सध्या निवडणूक घेणे शक्य नसल्याने या चार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढविण्याचे देखील स्पष्ट केले आहे. देशातील 58 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाल सहा -सहा महिन्याने दोन वेळा वाढविण्यात आला आहे.

 belgaum

दरम्यान, बेळगांव कॅंटोन्मेंट बोर्डाने निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे लोकनियुक्त सदस्य गोंधळून गेले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.