Sunday, May 5, 2024

/

मराठा बँकेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

 belgaum

शहरातील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मंगळवारी कोरोना कारणास्तव नियमित आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

खानापूर रोडवरील मराठा मंदिरच्या अर्जुनराव घोरपडे सभागृहामध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार हे होते. प्रारंभी पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये मराठा बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2019 -2020 या अहवाल सालातील सरकारी लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट वर्ग “अ” मिळाला आहे. त्याचप्रमाणे बँकेला यंदा 2 कोटी 50 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे स्पष्ट केले.

बँकेचे इन्चार्ज जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर यांनी 31 मार्च 2020 अखेरच्‍या वार्षिक अहवालातील ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक, नफा विभागणी, अंदाजपत्रक घटना दुरुस्ती व अन्य विषयांचे तपशीलवार वाचन करून सविस्तर माहिती दिली. बँकेचे सभासद मालोजीराव अष्टेकर, दत्तात्रय नाकाडी, अशोक कांबळे, अर्जुनराव गौंडाडकर, अनंत पाटील, देवकुमार बिर्जे, मोतेश बार्देशकर व इतरांनी सभेतील चर्चेत भाग घेऊन अहवालाला एकमताने मंजुरी दिली.

 belgaum

याप्रसंगी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, दिपक दळवी, बाळासाहेब काकतकर, एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, शेखर हंडे, सुनील अष्टेकर, सुशीलकुमार कोकाटे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, आणि सौ. रेणू किल्लेकर यांच्यासह बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हाईस चेअरमन सौ. निना काकतकर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.