Saturday, November 23, 2024

/

परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

 belgaum

आपल्याला देखील सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या बेळगाव विभाग कर्मचारी यांनी सुरू केलेल्या संपाला विविध संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.

बेळगांव मध्यवर्ती बस स्थानकातील बससेवा स्थगित करून परिवहन कर्मचारी आज आपल्या पोटापाण्याचा विचार न करता आंदोलन करताना दिसत होते.

परिवहन कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना आणि कन्नड संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. सदर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज मध्यवर्ती बसस्थानक आवारात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर यांनीही कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला

दरम्यान, परिवहन कर्मचार्‍यांनी पूर्वकल्पना न देता अचानक पुकारलेल्या संपामुळे आज प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली. विशेषकरून राज्यात अन्यत्र दूरच्या प्रवासात जाणाऱ्या बसगाड्या तसेच गोवा आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.