राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर तीन दिवस ठप्प असलेली बससेवा सोमवार पासून पूर्ववत होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. दरम्यान परिवहन मंत्री आणि परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये बैठक होऊन या आंदोलनावर पडदा पडला होता. परंतु पुन्हा या ‘समझोत्यावर’ कर्मचारी आणि सरकारचा काडीमोड झाला असून काही मागण्या सरकारने मान्य न केल्यामुळे हा संप उद्याही सुरूच राहणार असल्याची माहिती परिवहन कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर रात्री 8 च्या सुमारास संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र एका तासांतच परिवहन खात्याचे कर्मचारी युनियन आणि भाजप सरकार यांच्यात न्हा वाद होऊन युनियन कर्मचारी चिडले आणि त्यांनी पुन्हा संप पुढे चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग तीन दिवस सुरु असलेले आंदोलन आज सामंजस्याने मिटले आहे असे जाणवले. परंतु या वादावर पडलेला पडदा पुन्हा नाट्यमयरित्या खुला झाल्यामुळे पुन्हा संप तसाच सुरु राहणार आहे.
राज्य सरकारने युनियनच्या अनेक मागण्या मान्य केल्या असल्या तरी सरकारी नोकरीचा दर्जा देण्याच्या मागणीबाबतीत नकार दिला आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचा संप असाच सुरु राहणार असून सोमवारी देखील बेळगाव मधील बससेवा ठप्प राहणार आहे.
काही तासांपूर्वी संघटनेने संप संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी संघटनेचे नेते मॅजेस्टिक बसस्थानकात बससेवा पूर्ववत करण्याच्या तयारीत होते. दरम्यान प्रवासी वर्गानेही तातडीने पुन्हा बसस्थानकावर धाव घेतली. परंतु तासाभरातच परिवहन कर्मचारी संघटनेचा निर्णय बदलल्याने पुन्हा प्रवाशांची गैरसोय झाली.
यानंतर काही वेळातच कामगार संघटनेचे नेते आर. चंद्रशेखर आणि कामगार संघटनेचे मानद अध्यक्ष कोडीहळ्ळी यांनी उद्यानात बैठक घेतली. दरम्यान सामंजस्याची चर्चा फिसकाळी असून परिवहन कमर्चाऱ्यांनी हा संप सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.