दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.नानावाडी येथील रायगड गेट जवळ हा अपघात घडला आहे.
रोहन धामणेकर वय 23 रा. रामनगर कंग्राळी खुर्द असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन हा आपल्या एफ झेड दुचाकीवरून नानावाडी रायगड गेट जवळून जात असताना वेगात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाडाला आदळली या घटनेत रोहनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती लागलीच त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र अधिक रक्त स्त्राव झाल्याने त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.रोहन हा बी के कॉलेजचा विध्यार्थी आहे त्याच्या पश्चयात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे.