गितीका, वय वर्षे चाळीस. आमची नेहमीची पेशंट. डॉक्टरांना नसेल तेव्हढं हिला वैद्यकिय ज्ञान. इंटरनेटवर फक्त आजारांची, त्यांच्या ट्रिटमेंटची माहिती वाचणं हा गितीकाचा आवडता छंद. बरं तेवढ्यावरच थांबायचं नाही. नवीन आजार ऐकला रे एकला या बाईंना त्याची लक्षणं स्वतः मध्ये दिसायलाच लागायची. दर दोन महिन्यातून एकदा हार्टअटॅक येता येता रहायचा. टीव्हीवर स्वाईन फ्लूची जाहिरात दिसली की यांना शिंका यायच्याच.
टीव्हीमधूनही संसर्ग होतो की काय असंच वाटायचं तेव्हा. सगळ्या प्रकारच्या टेस्ट, सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स करून करून किमान पाच सहा फोल्डर तयार झाले होते. कुठल्या डॉक्टरनी कोणती टेस्ट कधी केली? काय रिपोर्ट आला मग कोणतं औषधं घेतलं? कोणत्या डॉक्टरना किती कळतं वा कळत नाही याची इत्यंभूत माहिती गितीकाला होती. शहरातल्या सगळ्या पॅथीच्या डॉक्टरांची तपशीलवार माहिती गितीकाकडे सहज मिळाली असती. गमतीचा भाग वगळला तर आपल्या सगळ्यांमध्येच असा एक तर्हेवाईक माणूस दडलेला असतो. वेळोवेळी हा तर्हेवाईकपणा डोकं वर काढतच असतो. पण याचा विकार झाला, प्रमाण अति झालं की या प्रकाराला ’हायपोकाँड्रीयासिस’ म्हणतात. होय! असे रूग्ण आजकाल खूपच प्रमाणात दिसतात. वैद्यकीय क्षेत्रात अशा रूग्णांचा खूप गैरफायदा घेतला जातो.
हायपोकाँड्रीयासिस- स्वतःच्या तब्येतीबद्द अकारण अवास्तव काळजी वाटणे या विकाराला हायपोकाँड्रीयासिस असे संबोधता येईल. सतत काही ना काही आरोग्याच्या तक्रारी वाटणे, ज्यामुळे आपल्याला काहीतरी मोठा बरा न होणारा आजार आहे असे रूग्णाला वाटत राहते. कितीही सांगितलं की कोणताही आजार नाही. सगळे रिपोर्टस् नॉर्मल आहेत तरीही रूग्णाच्या मनाला ते पटतच नाही. डॉक्टरांनी कितीही समजावलं तरी रूग्णाच्या वर्तणुकीत काही फरक पडत नाही. एकूण रूग्णांच्या 5 ते 10 टक्के पेशंट असे असतात. यात स्त्री पुरूष प्रमाण सारखे असते. उतारवयात हा विकार बळावतो.
कारणे- दुःखद लहानपण, कमीपणाची भावना, समाजाकडून धिक्कारले जाण्याची भावना, एकटेपणा, आयुष्यात खूप काही गमवावे लागणे, आर्थिक चणचण या सगळ्या इमोशनल फॅक्टर्समुळे न्यूनगंड, दुष्टपणा, चिडखोरपणा, अपराधी भावना निरनिराळ्या प्रमाणात वाढीस लागतात आणि प्रत्येक माणसात कमी अधिक प्रमाणात हायपोकाँड्रियासीस तयार होतो.
www.drsonalisarnobat.com
लक्षणे- लक्षणांमध्ये पचनाच्या व हृदयाच्या संबंधित तक्रारी जास्त आढळून येतात. अतिभावनाप्रधान होणे मेलोड्रामॅटिक होणे अशा रूग्णांच्या बाबतीत साहजिक असते. कॅन्सर असण्याची भावना तशी लक्षणं सहजच आपल्याला आहेत असं हे रूग्ण छातीठोपणे सांगतात.
अशावेळी प्रथम सर्व तपासण्या कराव्याच लागतात. त्याशिवाय नैराश्य, वृत्तीभंग (सिझोफ्रेनिया) काळजी विकार यांच्याही लक्षणांचा विचार करावा लागतो.
उपचार- अशा रूग्णावर उपचार करणे ही एक कला आहे. फक्त एकच वैद्यक शास्त्र असं आहे, ज्याला सायन्स अँड आर्ट असं संबोधलं जातं ते म्हणजे होमिओपॅथी. रूग्णाच्या कलेनं घेत, समुपदेशन करत उपचार करणं फार अवघड काम असतं. फक्त होमिओपॅथीतच हॉयपोकाँड्रीयासिस घालवणारी खास औषधं आहेत. त्यासाठी तज्ज्ञ आणि अशा केसीस हाताळलेल्या डॉक्टरांची मदत घ्यावी लागते हे सुध्दा तितकेच खरे!
9916106896
9964946918
https://www.facebook.com/375504746140458/posts/1277244769299780/