स्नायू व चेतनवाहिन्या यांचे कार्य एकमेकास पूरक असते. स्नायूंकडून संवेदना मेंदूकडे पाचवणे व मेंदूकडून आलेल्या संदेशाला अनुसरून स्नायूंकडून काम करून घेणे असे एक चक्र अव्हायतपणे चालू असते. मायस्थेनिया ग्रेव्हीस हा एक स्नायू मज्जासंस्थेचा गंभीर आजार आहे. हळुहळू स्नायूंची लवचिकता कमी होऊन स्नायू लुळा पडतो. शरीराचे ऐच्छिक स्नायू (ऐच्छिक स्नायू म्हणजे जे स्नायू आपल्या इच्छेप्रमाणे आकुंचन प्रसरण करता येतात ते) इच्छेप्रमाणे काम करेनासे होतात.
कारणे- न्यूरोमस्कुलर जंक्शन म्हणजे स्नायू चेतनवाहिनी जोड जेथे असतो तेथील रसायनांना मारक ठरणारी स्वतःचीच संरक्षक पेशी कारणीभूत ठरते. या प्रकारच्या विकारांना ऑटोइम्युन डिसॉर्डर म्हणतात. म्हणजे स्वतःच्या शरीरातील संरक्षक पेशी स्वतःच्याच चांगल्या पेशींवर तुटून पडतात व असा प्रकार घडवून आणतात. छातीमध्ये मधोमध बरगड्यांचा जोड असतो. तेथे थायमस नावाची एक ग्रंथी असते. या ग्रंथीच्या पेशी अवचीत वाढून ट्युमर तयार झाल्यासदेखील त्यातून अशा विध्वंसक पेशी तयार होतात. अशानेही मायस्थेनिया होऊ शकतो.
लक्षणे- हा आजार सर्वसाधारणतः 15 ते 50 वयोगटातील स्त्री पुरूषांना होतो. स्त्रियांमधील या आजाराचे प्रमाण पुरूषांपेक्षाही जास्त आहे. सुरूवातीला लक्षणांचे स्वरूप कमी अधिक असते. मानसिक ताण, अति शारीरिक श्रम, संसर्गजन्य आजार, गरोदरपणा इत्यादीवेळी स्नायूदौर्बल्याचे प्रमाण वाढते राहते.
मुख्य लक्षण म्हणजे स्नायूमधील असामान्य थकवा हेच होय. सुरूवातीला साधारण शक्ती जाणवते. परंतु प्रयत्न करता करता पूर्ण थकवा येतो. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी सगळे स्नायू संपूर्ण शिथिल पडतात. सुरूवातीची लक्षणे डोळ्याच्या पापण्या व कपाळाच्या आठ्यांमध्ये जाणवतात. पापण्या उघडताही येत नाहीत. कपाळाला आठ्या घालता येत नाहीत. जबडा हलवणे, अन्न चावून खाणे, गिळणे, बोलणे इ. दुरापास्त होते. या सर्व गोष्टींना सर्वसाधारण जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो. हातापायाचे स्नायू ढिले पडतात. जास्तीत जास्त खांद्याचे स्नायू लवकर बळी पडतात. कपडे वाळत घालणे, वेणी घालणे अशी कामेसुध्दा थांबून थांबून करावी लागतात. कित्येकदा आजार वाढत जाऊन श्वसनाचे स्नायूसुध्दा लुळे पडतात. घशाचे स्नायू लुळे पडल्यामुळे ठसका आल्यावर गुदमरून मृत्यू येऊ शकतो. स्नायू लुळे पडल्यावर हातपाय बारीक होतात. गालफडं बसून येतात. परंतु एवढे असूनही मेंदूचे कार्य, स्मरणशक्ती शाबूत राहते.
निदान- या आजाराचे निदान करण्यासाठी टेन्सीलॉन टेस्ट, इलेक्ट्रो मायोग्राफी अशा तपासण्यांची मदत घ्यावी लागते.
उपचार- अॅलोपॅथिक उपचारांतर्गत पायरिडोस्टिगमीन, प्रोपॅथेलिन, क्वचित स्टिराईड्सचा आधार घ्यावा लागतो. कधी आजार खूपच बळावला असला तर रक्तघटक बदलण्याची प्रक्रिया (प्लाझमा एक्सचेंज- अँटीबॉडीज काढून टाकण्यासाठी) करावी लागते.
www.thebachflower.com
होमिओपॅथी- लक्षणे, लक्षणांची तीव्रता, बरोबरची इतर लक्षणे, लक्षणांचा वाढाव या सर्व गोष्टींचा अभ्यास करून होमिओपॅथिक उपचार करता येतात. कॉस्टीकम,प्लंबममेट, ऑरममेट, सिफीलीनम अशी अनेक औषधे व्यक्तिविशिष्ट वापरता येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हा आजार रूग्ण तसेच डॉक्टरांच्या लवकरात लवकर लक्षात यायला हवा, तरच या आजाराला मधल्यामध्ये थोपवता येते.
9916106896
9964946918
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1282615762096014&id=375504746140458