ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. अनेक गावात आता निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी अनेक ठिकाणी टक्कर होणार आहे. कडोलीत मात्र तीन पॅनल उभे राहण्याची शक्यता आहे.
यामध्ये सत्ताधारी काँग्रेसप्रणित विकास आघाडी आणि म ए समिती प्रणित भाजप आघाडी होण्याची शक्यता असून या दुरंगी लढतीत आता आणखी एक पॅनल उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकाची रणधुमाळी कडोली जोरदार सुरू असून कुणाचे पॅनल येणार याकडे सार्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.
कडोली जाफरवाडी देवगिरी गुंजनहट्टी या गावांचा समावेश कडोली ग्रामपंचायत मध्ये येतो. यांची सदस्य संख्या 27 इतकी आहे. कडोली वार्ड बदल करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत मध्ये 14 महिला तर 13 पुरुष सदस्य उमेदवार असणार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडी आणि महाराष्ट्र एकीकरण तसेच भाजपप्रणीत महाविकास आघाडी आपले उमेदवार रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत असतानाच आणखी एक पॅनल या ठिकाणी उभे राहणार आहे.
त्या पॅनल कडे नागरिकांचे अधिक झुकते माप दिसून येत असल्याचे ही चर्चा जोरदार सुरू आहे. हे पॅनल सागर पाटील यांच्या या अख्यारीत उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अनेक सदस्यांनी राबवलेल्या विकास कामावर यांचे भवितव्य ठरणार आहे. मागील पाच वर्षे कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडी यांची सत्ता कडोली ग्रामपंचायतीवर होती. आता तिचा पाडाव करण्यासाठी अनेक जण पुढाकार येत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी जोरदार प्रयत्न करत असून नेमके कुणाचे पॅनल कडोली ग्रामपंचायतीवर येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. सत्ताधारी सदस्यांचे गणिते बदलणार आहेत. परिणामी इच्छुक उमेदवारांनी मतदारांची नव्याने चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक जण नवीन सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत तर युवा वर्ग हि मागे राहिला नाही.
त्यांनीही कडोली ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उडी घेतली आहे. संपूर्ण युवा वर्ग तिसऱ्या पॅनल अखत्यारीत काम करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नेमकी सत्ता कुणाची येणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.