आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण दिवसभर ग्रामीण भागातील विजयाचा गुलाल शहर परिसरात उडालेला दिसून आला. काही उमेदवार बहुमताने तर काही उमेदवार थोड्याशा फरकाने विजयी झाले आहेत. तर अनेक ठिकाणी केवळ एका मताच्या फरकानेही उमेदवार विजयी झाले आहेत.
हलगा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक २ मधून अनुसूचित जाती वर्गातून निवडणूक लढविलेल्या सरोज यशवंत वडगावी या महिला उमेदवाराचा एका मताने विजय झाला आहे. या निवडणुकीत सरोज वडगावी यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा नीलव्वा अशोक कुरंगी यांचा केवळ एका मताने पराभव झाला आहे.
हलगा वॉर्ड क्रमांक २ मध्ये सागर कामाण्णाचे आणि कल्पना किरण हणमंताचे हे दोन उमेदवार निवडून आले आहेत तिसऱ्या अनुसूचित वर्गासाठी निवडणूक लढविणाऱ्या सरोज यशवंत वडगावी आणि नीलव्वा अशोक कुरंगी यांना १४३ आणि १४२ अशी अनुक्रमे मते पडली असून केवळ एका मताच्या फरकाने कुरंगी यांचा निसटता पराभव झाला असून वडगावी यांनी बाजी मारली आहे.
यादरम्यान पुनर्मतमोजणी करण्याची मागणीही करण्यात आली. परंतु दहा पोलिंग एजंट एका ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे एक मताच्या फरकाने वडगाव यांचा विजय घोषित करण्यात आला आहे.