Friday, January 10, 2025

/

बेळगावमधील जनतेच्या सेवेसाठी रुजू होणार ११२!

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात पोलीस खात्याने आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नवी सेवा जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची मदत जनतेला हवी असल्यास ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

यापूर्वी हि सेवा राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा हा सातवा जिल्हा असून ही हेल्पलाईन जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. यासंबंधी राज्यसरकारने नुकतेच आदेश जारी केले आहेत.

बेळगावमध्ये ही सेवा रविवार दिनांक १३ डिसेंबर पासून सुरु होणार असून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याहस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.112 service

याआधी रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांक, अग्निशामक दलासाठी १०२ क्रमांक आणि पोलीस सेवेसाठी १०० क्रमांक डायल केल्यानंतर संबंधित सेवा उपलब्ध होत असत. परंतु ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सर्व सेवांसाठी उपयुक्त ठरणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस या सर्व सेवांसहित इतर आपत्कालीन सेवा ११२ या क्रमांकावर उपलब्ध होणार आहेत.

या सेवेअंतर्गत तक्रारदाराचे जीपीएस लोकेशन, घटनास्थळ हे तात्काळ संबंधित विभागाकडे उपलब्ध होणार आहे, हे ११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य आहे. या हेल्पलाईनचे नियंत्रण कक्ष थेट बंगळूर येथून चालविले जाणार असून बंगळूरहून संबंधित पोलीस स्थाकाच्या व्याप्तीत सूचना देण्यात येणार आहेत. १०८, १०२, १०० अशा हेल्पलाईन हळूहळू कमी करण्यात येऊन सर्व हेल्पलाईन एकाच क्रमांकावर जोडण्याची प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.