कष्टावर्त अर्थातच मासिक ऋतुस्रावावेळी अतिशय वेदन होणे. स्त्रीविषयक सर्व रोगांमधील हा सर्वात जास्त आढळणारा विकार आहे. जसे राहणीमान उंचावत जाईल तसे या विकाराची वारंवारता जास्त आढळून येत आहे. 18 ते 25 या वयोगटात हा त्रास जास्त असतो. दर महिन्याला होणार्या या त्रासामुळे शिकणार्या किंवा नोकरी करणार्या स्त्रियांना नाहक क्लेश सहन करावे लागतात. अर्थात मासिक पाळीच्यावेळी प्रमाणात ओटीपोटात दुखणं हे अपेक्षितच असतं कारण स्त्रीबीज फलित न झाल्यास त्याचे विघटन होऊन गर्भाशयाचा आतील थर रक्तस्रावात रूपांतरित होऊन मासिक स्रावाला सुरूवात होते. स्त्रीबीजापासून तयार होणार्या हार्मोनमुळे असे प्रमाणात ओटीपोट किंवा कंबर दुखणे हे विशेषतः जननक्षम स्त्रीचे लक्षण असते.
कारणे- गर्भाशयमुखाचे छिद्र सूक्ष्म असल्यास आजूबाजूचे स्नायू मासिक पाळीच्यावेळी प्रमाणापेक्षा जस्त आकुंचन पावल्यामुळे असह्य वेदना होतात. काही विशिष्ट हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित झाल्यास कष्टावर्त होऊ शकते. मानसिकरित्या दुर्बल किंवा हळव्या असणार्या स्त्रियांमध्ये मूलतःच वेदना सहन करण्याची क्षमता कमी असल्याने कष्टावर्ताचा जास्तच त्रास होतो. मेंदूपासून निघणार्या काही चेतनतंतूमध्ये बिघाड झाल्यास आवर्तामुळे जास्त वेदना जाणवतात. विवाहित स्त्रियांमध्ये ‘कॉपर टी’ किंवा ‘लूप’ बसवलेले असल्यास शरीर त्या बाह्यवस्तूला शरीराबाहेर काढण्यास पाहते. त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊन असह्य वेदना होतात. गर्भाशय व बीजांडकोष वा जननेंदियांच्या जुनाट आजारानेसुध्दा कष्टावर्त होते.
लक्षणे- कष्टावर्ताच्या प्रकारानुसार लक्षणे आढळून येतात.
आरक्त कष्टार्तव- गर्भाशयाकडे बीजांडकोषाकडे रक्ताभिसरण अति प्रमाणात होऊन ओटीपोटात असह्य कळा येतात. ओटीपोटाच्या दोन्ही बाजूकडे (उजव्या व डाव्या) मुरडून येते. काहाीवेळा जुलाब होतात तर काही स्त्रियांना पाळीच्या वेळी शौचास साफ होत नाही. काही स्त्रियांना उलट्या होतात. अरूची उत्पन्न होते. पहिले एक ते दोन दिवस हा त्रास जास्त होतो.
कष्टावर्त शूळ- पोटात पिळवटून टाकल्यासारख्या वेदना होतात. कंबर, मांड्या, पाय अतिशय दुखतात. बारीक ताप येतो. अतिवेदनेमुळे चक्कर येणे, मळमळणे, बेशुध्द होणे, अशीही लक्षणं आढळतात. झोपूनच रहावे लागते. अंगावर जास्त जात नाही. परंतु वेदना मात्र जास्त असतात. व्यवस्थित स्राव झाल्यास वेदना कमी होतात.
www.drsonalisarnobat.com
उपचार
कष्टावर्तासाठी सर्वात्कृष्ट उपचार होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत.
1. सिमिसीफ्युगा- या औषधांच्या रूग्ण स्त्रिया अबोल आणि लाजर्या असतात. पाळी लवकर चालू होते. स्राव कमी जास्त होतो. पाठीत फिरत्या वेदना असतात. संधीवात असून मासिकपाळीचे स्राव कष्टावर्त असल्यास उपयुकय्त. पाळीच्या दिवसात मानसिक व शारीरिक लक्षणे वाढतात. उदासी वाढते. मृत्यूची भीती वाटते. कमरेच्या खाली वेदना, जितका स्राव जास्त तितक्या वेदना वाढतात. निद्रानाश होतो. पाळीच्या वेळी झटके येतात.
2. कॉक्यूलस- पाळीच्या दिवसात अशक्तपणा येतो. स्राव जाऊनही थकवा येतो. अविवाहित स्त्रियांना जास्त उपयुक्त पाळी आल्यावर मूळव्याधीचाही त्रास वाढतो.
3. हेलोनियम- पाळीच्या काळात अति स्राव व वेदना झाल्यामुळे अशक्त स्त्रियांच्या गर्भाशयाला जडत्व येते. मानसिक व शारीरिक श्रमामुळे गर्भाशयभ्रंश होतो. स्पर्श सहन होत नाही. सर्वांग ठसठसते.
घरगुती उपचार
झेंडू- रजोस्राव नियमित व वेदनारहित होण्यासाठी झेंडूच्या झाडांचा किंवा पाल्याचा अर्क गुणकारी आहे.
अशोकवृक्ष- या वृक्षाच्या सालीचा काढा घेतल्याने कष्टावर्त कमी होते.
इतर- दगदग, प्रवास, चिंता यावर नियंत्रण ठेवाव. शारीरिक स्वच्छता व विश्रांती यांचा अवलंब करावा.
9916106896
9964946918
कष्टावर्त (डिसमेनोरिया dysmenorrhea)म्हणजे काय?या स्त्रियांच्या आजारावर उपचार काय? काय सांगतात बेळगावच्या डॉ.सोनाली सरनोबत पहा खालील व्हीडिओत
https://www.facebook.com/livebelgaum/videos/2883471261908360/