एकीकडे रस्त्यारस्त्यांवर अगदी मोकाटपणे भ्रमंती करणारी भटकी कुत्री चिंतेचा विषय ठरला असतानाच, दुसरीकडे मात्र आपल्या मालकाचं घराचं दार न ओलांडणारा अन् रात्रंदिवस निष्ठेने संरक्षण करणारा, अनेकांच्या घरासमोरील पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्रा हा प्रत्येकाचाच अगदी जीवापाड जपलेला प्राणी.
याच जीवापाड जपलेल्या आपल्या घरासमोरील पाळीव कुत्र्याचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
कणबर्गी येथील राम मुतकेकर यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणजेच ‘वाघ्या’. वाघ्या हा दुसरा तिसरा कोणी नसून मुतगेकर कुटुंबीयांचा अगदी जवळचा असा पाळीव कुत्रा आहे. याचे नाव वाघ्या असे आहे.
या वाघ्याचा आठवा वाढदिवस अगदी कुटुंबातील एका छोट्या मुलाप्रमाणे साजरा करण्यात आला आहे. केक कापून आणि अत्यंत उत्साहात, कुटुंबातील सदस्यांनी आणि बालचमूंनी या वाघ्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे.
प्रत्येक व्यक्तीला प्राण्यांबद्दल प्रेम आणि द्या असतेच असे नाही. परंतु आपल्या कुटुंबातील एक सदस्य असे मानून एखाद्या प्राण्यावर जीव लावणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही.
परंतु कणबर्गी येथील मुतकेकर कुटुंबीयांनी आपल्या मुलाप्रमाणे वाढविलेल्या या वाघ्याचे मात्र कुटुंबातील सदस्याप्रमाणे केलेले लाड कुतूहलाचा विषय ठरत आहे.