शिवबसव नगर येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानात आज दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक कृष्ण षष्ठीच्या निमित्ताने आज मंदिर आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. आकर्षक आरास आणि बटू स्वरूपातील (श्री ज्योतिर्लिंगाचे मूळ स्वरूप) पूजा आज बांधण्यात आली होती. पुजारी लक्ष्मण बुणे यांनी आरास केली होती.
सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाला होता. अनेक भाविकांनी आज मंदिरात भेट देऊन दीपोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.
उद्या काळभैरव जयंती निमित्ताने मंदिरात पूजेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे.