Friday, January 31, 2025

/

लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी

 belgaum

रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर काही तासांच्या आतच लोकसभा निवडणुकीची चर्चा जोर धरू लागली. अद्याप लोकसभा निवडणूक जाहीर झाली नाही. परंतु सुरुवातीपासूनच भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावे बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत येऊ लागली.

आतापर्यंत ७० इच्छुक उमेदवारांनी भाजप हायकमांडकडे तिकिटासाठी अर्ज दाखल केला आहे. या चर्चेत अशा दिग्गजांची नावे चर्चेत आली आहेत, कि आता भाजपा गोटातून केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाव पुढे येणे इतकेच बाकी आहे, अशी उपहासात्मक चर्चा रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अमुक नेता इच्छुक आहे तमुक नेता इच्छुक आहे, अशा बातम्या दररोज प्रसिद्धीस येत आहे. काही दिवसांपूर्वी जगदीश शेट्टर यांचेही नाव चर्चेत आले होते. जगदीश शेट्टर यांना याबाबतीत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता या प्रश्नांवर त्यांनी प्रतिप्रश्न करत माझे नाव कसे काय चर्चेत आले? कोणी आणले? अशा प्रतिप्रश्नांनी पत्रकारांना भंडावून सोडले. आतापर्यंत भाजपातील जवळपास प्रत्येक नेत्याचे नाव या निवडणुकीसाठी चर्चेत आले असून आता केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाचा प्रस्ताव येणे बाकी असल्याची चर्चा रंगत आहे.

 belgaum

भाजप हायकमांडने राज्यसभा सदस्यपदी इराण्णा कडाडी आणि अशोक गस्ती अशा सामान्य कार्यकर्त्यांची निवड केल्यामुळे इतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची आकांक्षा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. भाजपचे दिल्ली विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, एम. बी. जिरली, डॉ. रवी पाटील, किरण जाधव, राजू चिकनगौडर, विरेश किवडसन्नावर, राजीव टोपण्णावर, रुद्राण्णा चंदरगी यांच्यासह ७० हून अधिक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत.

सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांना उमेदवारी भाजपच्या वतीने देण्यात येणार नसेल तर आपल्याला उमेदवारी द्या! अशा पद्धतीची मागणी अनेकांनी भाजप हाकमांडकडे केली आहे. बेळगावमध्ये शुक्रवारी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.