मच्छे पिरनवाडी ग्रामपंचायत निवडणुका होणार आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगाने सांगितले होते. मात्र या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे यांच्या निवडणुका रद्द करण्यात आले आहेत.सौन्दत्ती तालुक्यातील यरगट्टी अथणी तालुक्यातील कागवाड या ग्राम पंचायतच्या निवडणुका देखील रद्द झाल्या आहेत
त्यामुळे आता बेळगाव तालुक्यात एकूण 55 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मच्छे आणि पिरनवाडी या दोन्ही ग्रामपंचायती तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायती म्हणून ओळखले जात होत्या.
मच्छे येथे सुमारे 40 सदस्य संख्या असून या ग्रामपंचायतीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. याचबरोबर पिरणवाडी ही मोठी पंचायत असून येथेही मोठी चुरस निर्माण होणार होती. मात्र यांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधी निवडणूक आयोगाने पत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर आणखी काही दिवसानंतर नगरपंचायती साठी निवडणुका होतील असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील असे साऱ्यांना वाटले होते. मात्र दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता रद्द करण्यात आल्या आहेत.
नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर या निवडणुका नगरपंचायतीसाठी होतील असेही दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याची अधिकृत माहिती बेळगाव लाईव्हला मिळाली आहे. यासंबंधीचे पत्र बातमी बरोबरच प्रसिद्ध करण्यात येईल. बातमी बरोबरच प्रसिद्ध करण्यात येईल या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्याने येथील इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
त्यामुळे अनेकांनी ओल्या पार्ट्या व इतर केलेला खर्च वाया जाणार यात शंका नाही. इच्छुकांनी मात्र नाराजी व्यक्त करत आता पुढे होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही समजते.