Tuesday, May 7, 2024

/

बससेवा ठप्प शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

 belgaum

चायवाले पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी बेळगाव शहरातील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर चूल पेटवून चहा उकळण्यात आला आणि शेतकऱ्यांनी भारत बंदला आपला पाठींबा दिला. पोलिसांनी हस्तक्षेप केला तरीही शेतकरी ठाण मांडून आहेत.

आज सकाळी सहा पासूनच शेतकरी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दाखल झाले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी सर्वप्रथम टायर पेटवून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी धोरणांना विरोध केला.

यानंतर गेटवरच चूल पेटवून चहा बनविली. यामुळे पोलिसांचीही गोची झाली होती.पोलिसांनी चहा काढून घेतला चूल विझविली मात्र शेतकरी अधिकच संतप्त झाले. यामुळेबस स्थानकाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.Farmers protest

 belgaum

याचा परिणाम बस सेवेवर झाला. बेळगाव शहर, उपनगरी आणि बाह्य बस सेवा ठप्प झाली आहे.शेकडो प्रवासी बसच्या प्रतीक्षेत थांबलेले आहेत.यामुळे शेतकरी
बंदचा परिणाम जाणवला असूनअनेक प्रवाशांना बस मिळाली नसल्याने परत फिरावे लागले आहे.

सकाळचे दहा वाजे पर्यन्त बससेवा बंद होती साडे नऊ वाजता बस स्थानकावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले त्यामुळे बस स्थानकावरून जाणाऱ्या ना त्रास सहन करावा लागत होता.

 

बेळगावात मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांची निदर्शन-सकाळी सहापासून बस सेवा ठप्प-गेटवर बनवली चहा केला केंद्र सरकारचा निषेध

https://www.facebook.com/375504746140458/posts/1278695519154705/

बस स्थानकाच्या गेटवर उकळला चहा-संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन-सकाळी 6 वाजल्यापासूनच बेळगावातील बस सेवा ठप्प -पोलिसांनी गेट वर मांडलेली काढली चूल मात्र
अध्याप गेट वर सुरू आहे शेतकऱ्यांचे आंदोलन

https://www.facebook.com/375504746140458/posts/1278717255819198/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.