दिल्ली येथील हम फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १०० प्रभावशाली व्यक्तींची निवड करण्यात येते. यावर्षी यामध्ये बेळगावच्या व्यंकटेश रजपूतची निवड झाली आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या त्याच्या योगदानाची दखल घेऊन त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हम फाउंडेशनतर्फे यावर्षी कोविडमुळे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. व्यंकटेशने कोरोनाच्या काळात विविध शिष्यवृत्त्या प्रधानमंत्री सहाय्यता निधीला दिल्या. तसेच यापूर्वी केलेल्या कार्याची दखल हम फाउंडेशनने घेतली.
छात्र संसदेचे राज्य समन्वयपद, इंडोनेशिया येथे देशाचे प्रतिनिधित्व व्यंकटेशने केले आहे. यापुरवु त्याला मंगळूर येथील शामराव फाउंडेशनचा स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड, नॅशनल युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या निवडीने त्याचे कौतुक होत आहे.