शहापूर येथील किशन सांबरेकर यांच्या प्रामाणिकपणामुळे एका युवकाचे पॅन कार्डसह महत्त्वाची कागदपत्रे व कांही रोख रक्कम असणारे पैशाचे पाकीट बेळगांव लाईव्हच्या माध्यमातून सुखरूप परत मिळाल्याची घटना सोमवारी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, अळवण गल्ली शहापूर येथील किशन सांबरेकर या सामाजिक कार्यकर्त्यास गेल्या शनिवारी शहापूर परिसरात रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट सापडले. त्यांनी ते पाकीट तपासले असता त्यामध्ये पॅन कार्डसह कांही महत्त्वाची कागदपत्रे व थोडीफार रोख रक्कम आढळून आली.
पॅन कार्डवर दर्शन भरमा पाटील असे नांव आणि फोटो असल्यामुळे सांबरेकर यांनी त्वरित बेळगाव लाइव्हशी संपर्क साधला. त्यानंतर मला या व्यक्तीचे महत्वाचे कागदपत्र आणि पैसे मिळाले असून सदर व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन किशन सांबरेकर यांनी बेळगांव लाईव्हच्या माध्यमातून आपला मोबाईल नंबर देऊन पण केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देताना दर्शन पाटील याने लागलीच सांबरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर समक्ष भेटीअंती काल सोमवारी शहानिशा करून किशन सांबरेकर यांनी सापडलेले पैशाचे पाकीट सुखरूप दर्शन पाटील याच्याकडे सुपूर्द केले.
पैशाचे पाकीट सुखरूप परत मिळाल्यामुळे दर्शन पाटील याने समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले. बेळगांव लाईव्हमुळे आपल्या हातून हे कार्य घडल्याबद्दल किशन सांबरेकर यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
बेळगाव live अशी बातमी केली होती प्रसिद्ध
https://www.facebook.com/375504746140458/posts/1282728722084718/