निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान प्रत्येक तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून असतील. बेळगाव तालुक्यातही असाच नियम लागू झाला आहे.
त्यामुळे बेळगाव तालुक्यातील मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन कलादगी असणार आहेत. सध्या त्यांनी नुकतीच तालुका पंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत विविध सूचना केल्या आहेत. त्यामुळे यापुढे जर कोणत्याही नियमांचा भंग होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे सांगण्यात येत आहेत.
बेळगाव तालुक्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. ओल्या पार्ट्या व इतर आमिषे दाखवण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी या साऱ्या गैरप्रकारांवर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी नजर ठेवून आहेत. त्यामुळे यापुढे असे गैरप्रकार घडल्यास त्वरित निवडणूक आयोगाला याची माहिती देऊन कारवाई करण्याचेही त्यांनी या बैठकीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यासंबंधी गांभीर्य घेऊन आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी घेतलेल्या बैठकीत केले आहे. आचार संहिता भंग होऊ नये यासाठी अबकारी विभाग आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना केल्या आहेत.
त्यामुळे यापुढे बेळगाव तालुक्यात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलाडगी असणार आहेत.