ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दिनांक 22 व 27 डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वजण कामाला लागले असून काही जुन्या चेहऱ्या बरोबरच मात्र नवीन चेहरे ही रिंगणात उतरणार आहेत. त्याची तयारी आतापासून सुरू करण्यात आली आहे. मात्र या वेळी अनेक ठिकाणी नवीन चेहर्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील वेळी केलेल्या विकासकामांचा आढावा घेत या निवडणुकीत जे तारूण जातील तेच राहतील असे सांगण्यात येत आहे. मात्र विशेष करून नवीन चेहऱ्यांना नागरिक पसंती देतील. त्यामुळे ग्रामपंचायतीवर नवीन चेहरामोहरा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेळगाव तालुक्यातील 57 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी निवडणुकांआधी अनेकांनी प्रचार सुरू केला होता. आता निवडणुका जाहीर झाल्याने प्रचाराला गती मिळाली आहे. अजून ही अर्ज भरण्याची तारीख आली नसली तरी गुप्त प्रचार मात्र जोरदार सुरू आहेत.
त्यामुळे नेमकी सत्ता कोणाची येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव तालुक्यातील सत्तावन्न ग्रामपंचायतीमध्ये नवे चेहरे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नागरिक ही नव्या चेहऱ्यांना पसंती देतील असे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी उद्योग खात्रीतुन झालेल्या मोठा भ्रष्टाचारामुळे काही सदस्यांना ग्रामपंचायतीवर निवडून न देण्याबाबत बोलले जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.