Thursday, December 26, 2024

/

उद्याचा “भारत बंद” यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनांचे आवाहन

 belgaum

केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणून देशातील शेतकरी संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याच्या निषेधार्थ सर्व शेतकरी बंधु, कामगार व इतर सर्व संघटनांनी उद्या मंगळवार दि 8 डिसेंबर 2020 रोजी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदला सर्वांनी भरघोस पाठिंबा देण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेळगांव जिल्हा रयत संघटना, बेळगाव शहर, तालूक्यातील सर्व रयत संघटना-हरितसेनेतर्फे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणून देशातील शेतकरी संपवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप ठेऊन गेल्या 26 नोव्हेंबरपासून देशातील पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगणा सह इतर सर्व राज्यातील शेतकरी आजपर्यंत दिल्लीत रात्रंदिवस आंदोलन करत आहेत.

त्याचबरोबर मंगळवार दि. 8 डिसेंबर 2020 रोजी देशातील सर्व शेतकरी, कामगार,तसेच इतर संघटनांतर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तो बंद यशस्वी करण्यासाठी बेळगावमधील सर्व शेतकरी,कामगार,तसेच इतर संघटनाच्या माध्यमातून भाषा, जात, पंथ, पक्षभेद विसरुन भारत बंदला खंबीर पाठिंबा देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

त्यासाठी सर्व शेतकरी बंधु, कामगार व इतर सर्व संघटनानी भारत बंदला भरघोस पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. “जय किसान”या भारत बंदला उस्फूर्त पाठिंबा देण्यासाठी सर्व संघटनांनी आपला सक्रिय पाठिंबा व्यक्त करावा, असे आवाहन बेळगांव जिल्हा रयत संघटना,बेळगाव शहर, तालूक्यातील सर्व रयत संघटना-हरितसेनेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.