Monday, December 23, 2024

/

बेळगावमध्ये बसवर दगडफेक

 belgaum

बेळगावमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला दगडफेकीचे गालबोट लागले. कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत बंगळूर येथील आंदोलनाला बेळगावमधून पाठिंबा दर्शविला. यादरम्यान किल्ला तलावाजवळ दगडफेकीचा प्रकार घडला आहे.

किल्ला तलावानजीक बेळगावहुन संकेश्वर साठी जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती हाताळली.

मध्यवर्ती बसस्थानकावर परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा तसेच सरकारी सुविधा मिळण्यासाठी सुरु असलेल्या संपादरम्यान सर्व बस डेपोमध्ये थांबलेल्या आढळून आल्या. दरम्यान बसस्थानकापासून काही अंतरावरून अशोक सर्कलनजीक जाणाऱ्या संकेश्वर बसवर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान बसवर दगडफेक करणारे मात्र फरारी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.