राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार जिल्ह्यात आज २२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत चालल्याची माहिती येत असतानाच ब्रिटनसारख्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण ३५७४५० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ४४८७७ रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत.
१९८ रुग्ण हे सध्या रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल असून आजपर्यंत एकूण ३६८७४ रुग्णांची १४ दिवसांचा क्वारंटाईन अवधी तर २७५५०१ रुग्णांनी २८ दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केला आहे. आजपर्यंत एकूण ३५६३५९ रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून २६१२९ रुग्ण आजपर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत.
तर ३४२ जणांचा मृत्यूही झाला आहे. सध्यस्थितीत १९८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून आज नव्याने नोंद झालेल्या २२ रुग्णांपैकी १३ रुग्ण बेळगाव, अथणीतील १, हुक्केरीतील १, रायबाग मधील ६ आणि इतर ठिकाणच्या १ रुग्णाचा यात समावेश आहे.