Sunday, December 22, 2024

/

महिलेवर ऍसिड अटॅक..

 belgaum

फळांची विक्री करणाऱ्या महिलेवर ऍसिड फेकुन हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरात ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

रायबाग शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी फळांची विक्री करणाऱ्या महिलेवर ऍसिड हल्ला करण्यात आला घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन जखमी महिलेस उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल केले होते.

रायबाग येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर जखमी महिलेस उपचाराकरिता बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Acide attack

ऍसिड हल्ला झालेल्या घटनेच्या केवळ एक तास अंतरात आरोपी पोलीस स्थानकात स्वता होऊन शरण जात मी स्वता ऍसिड हल्ला केल्याची कबुली दिली. या शिवाय मी स्वतः विष सेवन केले असल्याचे देखील पोलिसांना सांगितले त्यानंतर आरोपींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

आणाप्पा शेठ असे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.फळांची विक्री करणाऱ्या महिलेवर ऍसिड हल्ला करत स्वता पोलीस स्थानकात हजर होऊन पोलिसां जवळ विष प्राशन केलेल्या वर देखीलजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.