‘सहकार्य समाजाचे, कर्तव्य युवा समितीचे’ हे ब्रीद घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याकरिता सीमाभागातील शाळांमधून पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविण्यात येत आहे.
शाळेतील शिक्षक, शाळा सुधारणा समिती, माजी विद्यार्थी आणि युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी येत्या 15 डिसेंबर पर्यंत युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावी. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे बरेच पालक आर्थिक अडचणीत आहेत.
अश्या गरजू विद्यार्थ्यांनाही युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य देण्यात येईल. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची नावे सुद्धा शाळांकडून मागविण्यात येत आहेत.
पटसंख्या आणि गरजू विद्यार्थ्यांची नावे देण्यासाठी युवा समितीचे स्थानिक पदाधिकारी तसेच श्रीकांत कदम ९६११७५६५२९, अश्वजित चौधरी ७३५३७८६८०४, सिद्धार्थ चौगुले 7338097882 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.